गावठी कट्यासह एक जण पोलिसांच्या ताब्यात

 गावठी कट्यासह एक जण पोलिसांच्या ताब्यात

सोनई पोलीसांची कामगिरीनेवासा तालुक्यातील चांदा शिवारात घोडेगाव-कुकाणा रोडवरील पुलावर पोलिसांनी एकाला गावठी कट्यासह अटक केली आहे.

सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे चांदा ता. नेवासा शिवारात घोडेगाव-कुकाणा रोडच्या पुलावर अशोक ऊत्तम फुलमाळी (रा.शास्री नगर, चांदा) हा इसम गावठी कट्यासह या ठिकाणी फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.

माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्पे व त्यांचे सहकारी यांनी चांदा शिवारात रात्री छापा टाकुन एक गावठी कट्यासह दोन जिवंत काडतुस, एक विना नंबरच्या स्कुटर सह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सोनाई पोलीस पुढील तपास करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post