अक्षय कर्डिलेंच्या वाढदिवसानिमित्त ऑक्सिजन, मास्कसह आरोग्यदायी मदत

 अक्षय कर्डिले यांचा विविध सामाजिक उपक्रमांने वाढदिवस साजराकोरोना संकट काळातील दुःख कमी करण्यासाठी प्रयत्नशील- अक्षय कर्डिलेनगर -तालुक्यावर जेव्हा-जेव्हा संकट आले तेव्हा-तेव्हा  माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना संकट काळात प्रत्येकावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कोरोनाच्या लढाईमध्ये सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. मागील वर्षी कोरोना संकट काळामध्ये सामाजिक भावनेतून पुढे येऊन आपला वाढदिवस साजरा न करता गोरगरीब कुटुंबीयांना किराणाचे वाटप करण्यात आले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटे मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून ते दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून राहुरी,पाथर्डी, नगर तालुका मतदार संघातील कोविड केअर सेंटरला उपयुक्त असे कोरोना प्रतिबंधक साहित्य वाटप करण्यात आले आहे.प्रत्येकाने या संकट काळामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करावे असे प्रतिपादन जिल्हा भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केले.
     भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस अक्षय कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी,नगर,पाथर्डी मतदार संघातील सर्वच कोविड केअर सेंटरला उपयुक्त साहित्यांनी भरलेल्या चार चाकी वाहनांचा रवानगी करण्याचा कार्यक्रमाचा शुभारंभ माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी अमोल घाडगे, सोमनाथ वामन, संदीप वाकचौरे, बाळासाहेब भगत आदीसह मित्रपरिवार उपस्थित होता.
       माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, गेल्या पाच वर्षापासून अक्षय कर्डिले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो आत्तापर्यंत अपंगांना दोनशे सायकलचे वाटप करण्यात आले दुष्काळामध्ये पाण्याच्या टँकरचे वाटप करण्यात आले याचबरोबर रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच मागील कोरोना संकट काळात मतदार संघातील प्रत्येक गरजूंना किराणा किटचे वाटप करण्यात आले होते. त्याच पद्धतीने याहीवर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे अशाच पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवत अक्षय कर्डिले यांचा  वाढदिवस साजरा केला.यावेळी राहुरी मतदार संघातील कोविड सेंटरमधील रुग्णांना व डॉक्टर तसेच आरोग्य सेविकांना अकराशे मास्कचे बॉक्स, 112 ऑक्सीजन सिलेंडर, रुग्णांच्या दैनंदिन वापरातील वस्तू,सॅनिटीजर आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. याचबरोबर नगर शहरातील बूथ हॉस्पिटला कोरोना प्रतिबंधक साहित्याचे वाटप करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post