एमआयडीसीमधील कामगारांसाठी लसीकरण केंद्र....

 एमआयडीसीमधील कामगारांसाठी लसीकरण केंद्र सुरू करा 

स्वराज्य कामगार संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदननगर - कामगार हा औद्योगिक क्षेत्रांमधील दुवा आहे. कोरोनाचा संसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना देशाची अर्थव्यवस्था ढासाळू नये यासाठी औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्या सुरू आहे कामगार आपला जीव धोक्यात घालून कंपन्यांमध्ये काम करत आहे. सुमारे एका कंपनीमध्ये १०० ते१००० कामगार कंपन्यांमध्ये एकत्रित काम करत असतात. कोरोना हा संसर्ग विषाणू असल्यामुळे कामगारांना आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाला आहे. व काही कामगारांचा कोरोना मुळे दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे हा संसर्ग थांबविण्यासाठी कामगारांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण महत्त्वाचे आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी लक्ष घालून नगर एमआयडीसीमधील मराठा चेंबर येथील लसीकरण केंद्र सुरू करून लवकरात-लवकर सर्व कामगारांचे लसीकरण करावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना आज स्वराज्य कामगार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे,सचिव आकाश दंडवते,सुनील शेवाळे,आदिनाथ शिरसाठ, स्वप्नील खराडे,दीपक परभने, सुनील देवकुळे,सचिन कांडेकर,रमेश शिंदे, शशिकांत संसारे,सागर बोरुडे,जितू तळेकर,अमोल उगले,सचिन गायकवाड, सोमनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post