सिंघमची हटके स्टाईल...पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी वेश बदलून घेतली पोलिसांची परिक्षा

 

वेश बदलून पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी घेतली पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेची परीक्षा...मुंबई : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश हे नेहमीच त्यांच्या वेगळ्या स्टाईलकरता चर्चेत असतात. त्याचीच प्रचित पुन्हा एकदा झाली आहे. यावेळेस ते थेट वेशांतर करून पोलीस स्टेशनमध्ये पाहणी करण्यासाठी पोहोचले. पोलीस नागरिकांशी सौजन्याने वागतात का? हे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तपासले आहे. यामध्ये काही पोलीस पास झाले तर काही पोलीस नापास झाले. आपण देखील ओळखूही शकत नाही असा अवतार करून कृष्णप्रकाश पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते.

बुधवारी मध्यरात्री १२ वाजता IPS कृष्णप्रकाश यांनी वेशांतर केले. एका मुस्लिम व्यक्तीच्या वेशात ते पिंपरी शहरात वावरले. यावेळी त्यांनी 'मटणवाले चाचा' दिसतील असे कपडे-गोल टोपी घातली आणि दाढी-केस लावले. कोणती शंका येऊ नये म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांना चाचीची भूमिका त्यांनी दिली. रात्री बाराच्या ठोक्याला खाजगी वाहनातून ते बाहेर पडले.

यावेळी त्यांनी पोलिसांची परीक्षा घेतली असून ते तीन पोलीस स्टेशनमध्ये गेले. पिंपरी, वाकड आणि हिंजवटी पोलीस स्टेशनमध्ये आणि जिथे नाकाबंदी लावण्यात आली आहे तिथे कृष्णप्रकाश गेले. काही ठिकाणी जावून त्यांनी पाहणी केली. यावेळेस हिंजवटी आणि वाकड पोलीस स्टेशनमधील पोलिसांचा व्यवहार त्यांना योग्य वाटला. पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये असे काही चित्र दिसून आले नाही. त्यांनी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये सांगितले की, एका ठिकाणी रुग्णवाहिकेची गरज आहे, पण चालक अधिकचे पैसे मागतोय. यावेळेस पिंपरी पोलिसांनी हवी ती मदत केली नाही.
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post