मनापासूनचे दातृत्त्व...कोविड सेंटरसाठी अंगणवाडी सेविकेने दिला एक महिन्याचा पगार

 अंगणवाडी सेविका मीनाताई मुसा शेख यांनी आपला एक महिन्याचा पगार आरोळे कोविड सेंटरला केला सुपूर्त जामखेड - रमजान महिना हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना असतो या महिन्यात सर्व मुस्लीम बांधव एक महिन्याचे निरंकार उपवास करून नमाज पठन करतात . रमजान ईदचे औचीत्य साधुन जामखेड तालुक्यातील जवळा गावातील अंगणवाडी सेविका मीनाताई मुसा शेख यांनी चक्क एक महिन्याचा पगार आरोळे कोविड सेंटरला सुपूर्त केला .

    महाराष्ट्र तसेच जगावर कोरोणा या विषाणूच्या संसर्ग रोगाने थैमान घातले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस खूप मोठे कोरोणा पेशंट वाढत असून त्याचप्रमाणे जामखेड तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात कोरोणा विषाणूचा संसर्ग होत आहे. या काळामध्ये डॉक्टर रविदादा आरोळे यांनी जामखेड येथे मोफत सुविधा कोरोणा संसर्ग झालेल्या व्यक्तिंना देत आहेत. रमजान ईदचे औचित्य साधुन पवित्र अशा रमजान महित्यात सौ . मीनाताई शेख यांनी एक महिन्याचा पगार डॉक्टर आरोळे यांना तो सुपूर्त करण्यात आला. त्याप्रसंगी डॉक्टर रविदादा आरोळे,जामखेड पंचायत समितीचे सभापती मा. सुर्यकांत (नाना) मोरे ; माजी सभापती भगवान मुरुमकर ; माजी सभापती सुभाष आव्हाड ; गटविकास धिकारी कोकणे साहेब ; जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे ; सामाजिक कार्यकर्ते अशोक धेंडे ; देवदैठन सरपंच दादासाहेब भोरे ; नय्युम शेख; समीर शेख ; जिवन रेडे उपस्थित होते .          

प्रतिनिधी नासीर पठाण सह अशोक वीर जामखेड .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post