नगर तालुक्यातील 'या' गावात दहा दिवसाचा जनता कर्फ्यू

 जेऊर मध्ये आजपासून जनता कर्फ्यू
जेऊर- नगर नगर तालुक्याती जेऊर येथे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आज सोमवार( दि. ३)पासून ते मंगळवार (दि. ११) पर्यंत ग्रामस्तरीय समितीच्या वतीने जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे.

     याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कहर केला आहे. आजतागायत जेऊर मध्ये सुमारे ५०० च्यावर कोरोना रुग्ण आढळून आले आहेत तर सद्यस्थितीत सक्रीय रुग्णांची संख्या १०० च्या वर आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.

     कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी ग्रामस्तरीय समितीने गावामध्ये जनता कर्फ्यू पुकारला आहे. जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. जनता कर्फ्यू दरम्यान नागरिकांनी सर्व आदेशाचे पालन करण्याचे आवाहन कोरोना ग्रामस्तरीय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

     जेऊर गावामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या जास्त असून त्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. जेऊर कोरोना समितीने जनता कर्फ्यू पुकारण्याचा घेतलेल्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.


प्रशासन सतर्क पण नागरिकांचा हलगर्जीपणा

कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु याबाबत नागरिक हलगर्जीपणा करत आहेत. विनाकारण गावात फिरणे, चौकाचौकात गप्पा मारत बसणे हे प्रकार टाळणे गरजेचे आहे.


नागरिकांनी खबरदारी घ्यावी

जेऊर गावामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून अनेक जणांना यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी. प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कर्डिले व कोरोना ग्रामस्तरीय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

1/Post a Comment/Comments

  1. दोन दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार जास्त करू नका प्रत्येक गोष्टीला म्हातारपण असतं

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post