केडगाव जागरूक नागरिक मंचाने कोविड केअर सेंटरला केले अन्नदान

 


अहमदनगर (प्रतिनिधी) -केडगाव जागरूक नागरिक मंच यांच्या वतीने आणि सद्दाम शेख यांच्या सहकार्याने केडगाव येथील डॉन बॉस्को कोविड सेंटर तसेच शिवांजली कोविड सेंटर येथे अन्नदान करण्यात आले. या अभूतपूर्व संकट समयी रुग्णसेवा ही  मंच आपले कर्तव्य समजतो असे गौरवोद्गार मंचाचे अध्यक्ष विशाल पाचरणे यांनी काढले आहे. मंचाने कोरोणा महामारी च्या संकटात काळात सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी उपक्रम हाती घेऊन समाज प्रति योगदान सुरू ठेवले आहे, असे गौरवोद्गार सद्दाम शेख यांनी या कार्यक्रम प्रसंगी काढले आहे.

या कार्यक्रमाला लॉयनकिंग ग्रुप आणि शिवरत्न प्रतिष्ठान चे मोलाचे सहकार्य लाभले आहे


यावेळी प्रवीण पाटसकर, गणेश पाडळे, किशोर पाटील, मंदार सटाणकर ,शुभम पाचारणे, युवराज शिंदे, जनार्दन भोजने, यांसह मंचाचे सदस्य उपस्थित होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post