अध्यात्माच्या दाही दिशा विनोदाचे प्रमाण देऊन सांगणारे विनोद सम्राट ह.भ.प बाबासाहेब इंगळे महाराज यांचे निधन

 अध्यात्माच्या दाही दिशा विनोदाचे प्रमाण देऊन सांगणारे विनोद सम्राट ह.भ.प बाबासाहेब इंगळे महाराज यांचे दुःखद निधनबीड-महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार विनोद सम्राट ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथे उपचारा दरम्यान  निधन झाले मागील पन्नास वर्षापासून वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन त्यांनी धर्मप्रसार केला. अध्यात्माच्या दाही दिशा आपल्या विनोदी चुुटकुले देऊन सांगणारे प्रख्यात कीर्तनकार म्हणून बाबासाहेब इंगळे महाराज यांची महाराष्ट्र आणि कर्नाटकात देखील मोठी ओळख होती


त्यांनी संप्रदाय पर अनेक कीर्तनाच्या कॅसेट काढल्या होत्या शिवाय काही विनोदी चुटकुळे लिहिलेले पुस्तकही प्रकाशित केले होते त्यामुळे यातून मिळणाऱ्या पैस्यातून त्यांनी आश्रम उभारून संप्रदायाचे बीड वडवणी तालुक्यात रोवले होते.


शिवाय विविध चैनल वर त्यांचे कीर्तने संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक ऐकत असत. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथील रहिवासी असणारे बाबासाहेब महाराज इंगळे यांनी इंगळे महाराज परमार्थ आश्रमाच्या माध्यमातून चिंचवडगाव परिसरातील राजा हरिश्चंद्र पिंपरी, पिंपरखेड, देवडी, काडीवडगाव, चींचोटी या गावांमध्ये धार्मिक वातावरणाला चालना दिली होती. परिसरातील सर्व गावांना ते आपलेच गाव मानीत होते. त्यांच्या किर्तनाने महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची मोठी ओळख निर्माण झाली होती 


आपल्या मधुर वाणीने त्यांनी संप्रदाय क्षेत्रात मोठी ओळख निर्माण करून कोणत्याही अभंगाच्यावर निरूपण करताना विनोदाच्या आणि वास्तववादी उदाहरणे आणि प्रमाणे देऊन संतांचा महिमा सांगणारे महान कीर्तनकार म्हणून बाबासाहेब इंगळे महाराजांची ओळख होती त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदाय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post