इंदोरीकर महाराजांविरोधात ‘अंनिस’ची उच्च न्यायालयात धाव

इंदोरीकर महाराजांविरोधात ‘अंनिस’ची उच्च न्यायालयात धावनगर : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संगमनेर न्यायालयानं दिलासा दिलाय. मात्र, इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण इंदोरीकर महाराजांविरोधात आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलीय. पुत्रप्राप्तीबाबत इंदोरीकर महाराजांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरुन अंधश्रद्धा निर्मुलन समितीने याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी 8 आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणात संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयाने खटला रद्द केला होता. त्यानंतर आता अंनिसने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. या याचिकेत अंनिसने इंदोरीकर महाराजांसह सरकारी पक्षालाही प्रतिवादी केलंय. अंधश्रद्ध निर्मुलन समितीच्या राज्य सचिव तथा याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी ही माहिती दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post