भारत सावरतोय...24 तासात रूग्ण बरे होण्याचा सर्वोच्च विक्रम


 

देशात करोनाच्या दुसरी लाट असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८५.६ टक्क्यांवर पोहोचलं आहे. गेल्या २४ तासात ४ लाख २२ हजार ४३६ रुग्णांनी करोनावर मात केली. पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

देशात मागच्या २४ तासात २ लाख ६३ हजार जणांना करोनाची बाधा झाली आहे. ७ मे रोजी हाच आकडा ४ लाख १४ हजार इतका होता. त्या तुलनेत रुग्ण संख्येत २७ टक्क्यांनी घट झाली आहे. देशात मंगळवारी रुग्णवाढीचा दर १४.१० टक्के इतका आहे. देशात आतापर्यंत १.८ टक्के लोकांनाच करोनाची लागण झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post