देशाला दिलासा...दीड महिन्यानंतर प्रथमच रूग्णसंख्या 2 लाखांच्या खाली

देशाला दिलासा...दीड महिन्यानंतर प्रथमच रूग्णसंख्या 2 लाखांच्या खाली

 


देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत एक लाख 96 हजार 427 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, देशात यापूर्वी 13 एप्रिल रोजी दोन लाखांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. त्यावेळी देशात 24 तासांत एक लाख 84 हजार रुग्णांची नोंद करण्यात आली होती. देशातील रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला लागला असला तरी देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. काल (सोमवारी) देशात 3511 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तीन लाख 26 हजार 850 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post