कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी कुचकामी, ICMR चा मोठा निर्णय

 

कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी कुचकामी, ICMR चा मोठा निर्णयनवी दिल्लीः कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ICMR आणि AIIMS यांनी प्लाझ्मा थेरपीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी काढून टाकण्यात आलीय. यासंदर्भात एम्स आणि आयसीएमआरने नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्यात. कोविड 19 वरील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या वतीनं एक बैठक घेण्यात आलीय. त्या बैठकीला अनेक सदस्य उपस्थित होते. या बैठकीतच प्लाझ्मा थेरपी कोरोना उपचार पद्धतीपासून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही आणि बर्‍याचदा हे अयोग्यपद्धतीने वापरले गेलेय

कोविड 19 मधून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तात उपस्थित अँटीबॉडीज गंभीर रुग्णांना दिली जातात. वृत्तानुसार, तज्ज्ञांच्या मते, 11,588 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी घेतल्यानंतर असे आढळून आले की, यामुळे रुग्णांच्या मृत्यू आणि रुग्णालयातून बाहेर पडण्याच्या प्रमाणात काही फरक पडला नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post