कोरोनामुळे भटक्या विमुक्तांसह मजुरांवर उपासमारीची वेळ ;सरकारने आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा करावी

 कोरोनामुळे भटक्या विमुक्तांसह मजुरांवर उपासमारीची वेळ 

सरकारने आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा करावी- विजयालक्ष्मी आनेराव ( प्रतिनिधी)  काष्टी - गेल्या महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेल्या लाँकडाऊनमुळे भटकंती करून उपजीविका भागवणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्ये प्रामुख्याने गोसावी ,गारुडी, घिसाडी, लोहार, गोंधळी ,जोशी डमरूवाले, कोल्हाटी,मसनजोगी ,नंदीवाले, सिकलकर ,वासुदेव ,भोई अशा भटकंती करून उपजीविका भागवणाऱ्या जमातीवर उपासमारीची वेळ आली आहे. महिना यापेक्षाही अधिक काळ लॉकडाउन झाले असून राज्य सरकारने अजूनही या  घटकांसाठी कुठलेही आर्थिक पॅकेज जाहीर केले नसून या वर्गावर ती उपासमारीची वेळ आली आहे. तरी  मुख्यमंत्री यांनी  भटक्या घटकांसाठी आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा करावी अशी मागणी भाजपा भटके-विमुक्त महाराष्ट्र प्रदेश संयोजक मा.श्री.नरेंद्र पवार,डॉ. उज्वलाताई हाके तसेच अशोक दादा चोरमुले, भुषण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विजयालक्ष्मी आणेराव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post