कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांनी नाही ऐकलतर पोलीस स्टेशनला तक्रार दयावी - सभापती सुरेखा गुंड


 कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांनी नाही ऐकलतर पोलीस स्टेशनला तक्रार दयावी - सभापती गुंड

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शसकीय कर्मचारी-पदाधिकारी यांचा समन्वय महत्वाचा : सभापती सुरेखा गुंड


 अहमदनगर : कोरोना आजाराचा आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग एकाकी झुंज देत आहे. गाव पातळीवर असणाऱ्या सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी पदाधिकारी यांनी समन्वयाने काम करुण त्यांना मदत करावयाची आहे. तरच कोरोना आटोक्यात येईल  असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड यांनी केले.

पं. स सभापती, यपसभापती, गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच, यांची नुकतीच ऑनलाईन सभा घेण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या. 

गुंड म्हणाल्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोविड ची लागण होऊन कधी नव्हे एवढे भयानक संकट समाजावर ओढवले आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी गाव पातळीवरील सर्व कर्मचारी अधिकारी यांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. आज फक्त आरोग्य विभाग ग्रामविकास विभाग आणि महसूल विभाग प्रत्यक्ष काम करताना दिसत आहे. आरोग्य आणि ग्रामविकास विभाग यांच्यावर खूप मोठा ताण आहे. या परिस्थितीमध्ये या तिन्ही विभागाला इतर विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी साथ देणे आवश्यक आहे. गावातील शिक्षक, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, बांधकाम विभाग, ह्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन या संकटावर मात करण्याची वेळ आली आहे.कोरोनाविषयी जे नागरिक  सांगूनही समजत नाही अशा लोकांना पोलिसी खाक्या दाखवला शिवाय पर्याय नाही. पोलिसांची संख्या जरी कमी असली तरी त्यांच्या मदतीला होमगार्ड सारखी व्यवस्था निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि किमान आठवड्यातून दोन वेळा तरी प्रत्येक गावांमध्ये भेट देऊन ज्या समाज घातक प्रवृत्तीवर  अत्यंत कडक कारवाई करणे गरजेचे आहे. गावातील पदाधिकाऱ्यांनीही राजकारण बाजूला ठेऊन  अधिकारी किंवा कर्मचाऱ्यां बरोबर किंवा त्याच्याही पुढे जाऊन काम करणे गरजेचे आहे. गाव पातळीवर विलगीकरण कक्ष स्थापन करावे तेथे शासकीय कर्मचाऱ्याची नेमनूक लावावी . कोरोनाची लागण झालेले रुग्ण विलगीकरण कक्षात येत नसतील तर त्यांना समज दयावी . नाही ऐकलतर पोलीस स्टेशनला तक्रार दयावी अशी तंबी यावेळी ग्रामसेवकांना देण्यात आली . तसेच गावात असणारे लॅब टेक्नेशियन कोरोना रुग्णाची तपासणी केल्यानंतर लागण झालेल्या रुग्णाचा अहवाल देत नाही ग्रामसेवकांनी लॅब चालकांना पॉजी टि०ह अहवालाची माहिती देण्यास सांगावे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post