जि.प.अध्यक्ष सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

 जि.प.अध्यक्ष नामदार सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांच्या पाठपुराव्याला यश


बोधेगावसह 35 गावाच्या सेवेसाठी बोधेगाव ग्रामीण रूग्णालय याठिकाणी होणार 50बेडचे सुसज्ज कोविड सेंटर
अहमदनगर याठिकाणी जिल्हा आढावा बैठकीत नामदार सौ. राजश्रीताई चंद्रशेखर पाटील यांनी पालकमंत्री हसनजी मुश्रीफ.साहेब महसूलमंत्री बाळासाहेबजी थोरात  व  जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले साहेब व सर्व आधिकारी वर्गाच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीत पालकमंत्री महोदय यांच्याकडे बोधेगाव ग्रामीण रुग्णालय याठिकाणी कोवीड सेंटर उभारण्यात यावे ही आग्रही मागणी केली होती याच मागणीला पालकमंत्री साहेबांनी तातडीने मंजुरी देत लगेचच  50बेड  असणारे सुसज्ज असे कोवीड सेंटर उभारण्यात येणार आहे,वर्षानुवर्षे बोधेगाव ग्रामीण रुग्णालय उपयोगाविना पडुन होते,बोधेगाव व परिसरातील 35गावाच्या सोयीसाठी आता बोधेगाव ग्रामीण रूग्णालय याठिकाणी लागणारे साधनसामग्री देखील बोधेगाव ग्रामीण रुग्णालय याठिकाणी प्राप्त झाले आहे,यामुळे बोधेगाव आणि परिसरातील नागरिकांना सर्व सोयीयुक्त कोवीड सेंटर आधार मिळणार आहे,

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post