घर घर लंगर सेवेच्या वतीने निशुल्क घर घर ऑक्सिजन सेवेचा शुभारंभ

 घर घर लंगर सेवेच्या वतीने निशुल्क घर घर ऑक्सिजन सेवेचा शुभारंभऑक्सिजन बेडच्या प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांना मिळणार लंगरसेवेच्या ऑक्सिजन कॅनचा आधार
अहमदनगर (प्रतिनिधी)- घर घर लंगर सेवा सर्वसामान्य घटक व शासन यांमधील दुवा म्हणून कार्य करीत आहे. गरज तिथे लंगर सेवेचे सेवादार पोहचत आहे. ऑक्सिजनची गरज ओळखून देवदूताप्रमाणे लंगर सेवा सर्वसामान्यांचे प्राण वाचविण्यासाठी पुढे सरसावली आहे. कोरोना किती काळ टिकेल माहित नसताना सुध्दा अविरतपणे लंगर सेवेच्या वतीने सर्व स्तरावर सुरु असलेले योगदान प्रेरणादायी आहे. पोलीस प्रशासनाला देखील या लंगरसेवेच्या सेवादारांच्या कार्यातून स्फुर्ती मिळत असल्याची भावना पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केली.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने निशुल्क घर घर ऑक्सिजन सेवेचा शुभारंभ पोलीस अधिक्षक पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. हॉटेल अशोका येथे झालेल्या या उपक्रमाप्रसंगी लंगर सेवेचे सेवादार उपस्थित होते.

प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी कोरोना रुग्णासाठी त्यांचे नातेवाईक ऑक्सिजन बेडसाठी धावाधाव करीत आहे. सरकारी व खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्व ऑक्सिजन बेड फुल आहेत. अशा परिस्थितीमध्ये ऑक्सिजन न मिळाल्याने कोणत्याही रुग्णांचे जीव जाऊ नये, या भावनेने घर घर लंगर सेवेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.

 या उपक्रमासाठी उद्योजक रामचंद्र भट व सिध्दार्थ भट यांचे विशेष आर्थिक सहयोग मिळाले आहे. रुग्णाला जो पर्यंत ऑक्सिजन बेड भेटत नाही. तो पर्यंत लंगर सेवेने रुग्णासाठी दिलेला ऑक्सिजन कॅन (बॉटल) जीवनदायी ठरणार आहे.  पाहुण्यांचे स्वागत राजा नारंग यांनी केले.
 डॉ.सिमरन वधवा यांनी ऑक्सिजन कॅनचे प्रात्यक्षित दाखविताना म्हणाल्या की, ऑक्सिजन कॅन वापरण्यास सहज व सोपे आहे. याला स्वत: रुग्ण आपल्या हातानी गरजेप्रमाणे वापरु शकतो.या ऑक्सिजन सेवेच्या उपक्रमासाठी हरजीतसिंग वधवा, जनक आहूजा, राहुल बजाज, प्रीतीपालसिंग धुप्पड, किशोर मुनोत, प्रशांत मुनोत, कैलास नवलानी, राहुल बजाज, राजा नारंग, सतिश गंभीर, राजेंद्र कंत्रोड, सनी वधवा, आदित्य छाजेड, कबीर धुप्पड, टोनी कुकरेजा, राजेश कुकरेजा, मन्नू कुकरेजा, करण धुप्पड, जय रंगलानी, बाबाजी गुरभेजसिंह, बलजित बिलरा, सुरेश कुकरेजा, काली लालवानी, सिमर वधवा, नारायण अरोरा, गोविंद खुराणा, जय रंगलानी, राहुल शर्मा, शरद बेरड, राजवंश धुप्पड, अजय पंजाबी, प्रमोद पांतम, पुरुषोत्तम बेती, संदेश रपारिया, सुनील मुळे, विपुल शाह योगदान देत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post