कल्याण रोड परिसराचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागणार-आ. संग्राम जगताप

 गणेश नगर मधील पाण्याच्या टाकी जवळील संपवेळच्या जागेची पाहणी


कल्याण रोड परिसराचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागणार-आ. संग्राम जगतापअहमदनगर प्रतिनिधी- कल्याण रोड परिसरातील नागरी वसाहत झपाट्याने वाढत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या भागाचा पाणीप्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे, तो सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहे. या भागाचे फेज टू पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच हे काम पूर्ण होईल फेज टू द्वारे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गणेश नगर येथील १० लक्ष पाण्याची टाकी भरण्यासाठी टाकीच्या खाली साडेतीन लाख दशलक्ष लिटरचा संपवेळच्या कामाला मंजुरी मिळाली असून हे काम लवकरच पूर्ण करून पूर्ण क्षमतेने टाकी भरण्यात येणार आहे. कल्याण रोडच्या दोन्ही भागातील शेवटच्या घरापर्यंत पाणी देणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

         कल्याण रोड परिसरातील गणेश नगर मधील पाण्याच्या टाकी तसेच संपवेलेच्या कामाची पाहणी करताना आ.संग्राम जगताप ,उपायुक्त यशवंत डांगे,नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक श्याम(आप्पा) नलकांडे,मा.नगरसेवक दत्तात्रय मुदगल,इंजि.परिमल निकम,,रोहिदास सातपुते,इंजि.बल्लाळ,युवराज शिंदे,वैभव वाघ,सचिन मुदगल,गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

       आ.संग्राम जगताप पुढे म्हणाले की,कल्याण रोडचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी नगरसेवक सचिन शिंदे तसेच नगरसेवक श्याम नाळकांडे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता, याच बरोबर कल्याण रोडचे विविध विकासकामांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. या पुढील काळात टप्प्याटप्प्याने विकास कामे मार्गी लावू,लवकरच कल्याण रोडच्या सक्कर चौक ते रेल्वेपुला पर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू होणार आहे.यासाठी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार व रस्ते महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरवठा केला होता त्यानुसार हे काम मार्गी लागले आहे असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post