कै. देवाजी कार्ले मित्र मंडळाच्यावतीने कोवीड सेंटरला मदत

 

वाढदिवसानिमित्त होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत चास येथील कै. देवाजी कार्ले मित्र मंडळाच्या वतीने कोवीड सेंटरला पाचशे पाण्याच्या बॉटल देत सामाजीक बांधीलकी जपण्याचे काम मित्र मंडळाने केले. कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर  याच्या वतीने वांळुज येथे  कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे . या सेंटर मध्ये नगर तालुक्यातील गरजू कुंटुब उपचार घेत आहे . या कुंटुबाल आधार देण्यासाठी येथील कै. देवाजी कार्ले मित्र मंडळाच्या वतीने पाचशे पाण्याच्या बॉटल अक्षय कर्डीले यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्या . या मित्र  मंडळाच्या वतीने नेहमीच सामाजीक उपक्रम राबविले जात असतात असे उपसरपंच युवराज कार्ले यांनी सांगीतले. या वेळी  उपसभापती संतोष म्हस्के, उपसरपंच युवराज कार्ले किरण  काळे, किरण देवाजी कार्ले, विजू कर्डिले ,स्वप्नील शिंदे सह डॉक्टर उपास्थित होते 


Attachments area

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post