मराठा आरक्षणाविरोधात राष्ट्रवादीच्याच काही लोकांच्या याचिका, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप


मराठा आरक्षणाविरोधात राष्ट्रवादीच्याच काही लोकांच्या याचिका, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोपमुंबई : सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकार आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण सुरू झालं आहे. राज्य सरकारनं निष्काळजीपणा दाखवल्यामुळे हाती निराशा लागल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यावर राज्य सरकारनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री अशोक चव्हाण आणि नवाब मलिक यांनी फडणवीस जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत असल्याचं म्हटलं. याच्या प्रत्युत्तरात देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठा आरोप केला आहे.

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पॉन्सर्ड आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्या होत्या, असं फडणवीस म्हणाले. 

राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी याआधी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्या होत्या. त्यांच्या काही लोकांशी बैठका देखील झाल्या होत्या. राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांना खोटं बोलण्याचा रोग जडला आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post