हजारो रूग्णांवर मोफत उपचार करणार्‍या कोविड सेंटरसाठी डोणगाव ग्रामस्थांची उत्स्फूर्त मदत

 हजारो रूग्णांवर मोफत उपचार करणार्‍या कोविड सेंटरसाठी डोणगाव ग्रामस्थांची उत्स्फूर्त मदतजामखेड - कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्‍या आरोळे कोविड सेंटरमधुन आतापर्यंत हजारो कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत यामुळे संपूर्ण राज्यात एक वेगळा आदर्श आरोळे कोविड सेंटरने निर्माण केला आहे. या कोविड सेंटरला सामाजिक दातृत्वातुन मदत करणे हे आपले कर्तव्य समजून डोणगाव ग्रामस्थांनी आज अकरा हजार रुपये रोख, अन्नधान्य, भाजीपाला व किराणा याची मदत आरोळे कोविड सेंटरला केली. 

        डोणगाव ग्रामस्थांनी आरोळे कोविड सेंटरच्या सुलताना (भाभी) शेख यांच्याकडे मदत सुपूर्द केली यावेळी पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, देवदैठनचे सरपंच अनिल भोरे, नायगावचे सरपंच अनिल तोंडे, भातोडीचे सरपंच बळीराम गीते, अशोक धेंडे, डोणगावचे माजी सरपंच बाळासाहेब यादव मेजर, पोलीस पाटील बिबीशन यादव,  माजी चेअरमन किसन यादव, ग्रामपंचायत सदस्य पोपट फुले,  अण्णा यादव, शिवाजी सातव, युवा नेतृत्व महेश यादव,  संदीप भुजबळ, शिवाजी यादव ( रोहन किराणा स्टोअर), शामराव यादव ( माजी सरपंच ), शुभम यादव, वैभव यादव, विजू काळे, विजू जमदाडे, कैलास मुळे, संभाजी यादव, सरपंच अर्जुन यादव, अंकुश पोळ, अमोल यादव ( ग्रामपंचायत सदस्य), नितीन वारे (ग्रामपंचायत सदस्य), प्रवीण गायकवाड ( उपसरपंच डोणगाव ), सोमीनाथ सातव (कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन), कैलास पवार (माजी सरपंच), माणिक यादव, सुनील होनमोने, गणेश यादव,अमोल यादव, राम पवळ इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

    

प्रतिनिधी नासीर पठाण सह कॅमेरामन अशोक वीर जामखेड '

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post