नगर शहरात पुन्हा लॉकडाऊन वाढला

 नगर शहरात पुन्हा लॉकडाऊन वाढला


नगर - नगर शहरात सुरू असलेले कडक निर्बंध अर्थात लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी दिली आहे त्यासंदर्भात आज सायंकाळी आदेश काढले जाणार असल्याच त्यांनी यावेळी सांगितलेनगर शहरात कोरोनाचा सुरू असलेला उद्रेक पाहता महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी 3 ते 10 मे या कालावधीत हॉस्पिटल, मेडिकल आणि दूध विक्री (सकाळी 7 ते 11) याच्याशिवाय सर्व अस्थापना बंदचा आदेश काढला होता. आज सोमवारी रात्री हा आदेश संपुष्टात येणार होता. त्यापूर्वी आज आयुक्त शंकर गोरे, महापौर बाबासाहेब वाकळे, उपायुक्त प्रदीप पठारे यांची बैठक झाली. या बैठकीत नगर शहरात सुरू असलेले लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

कुठल्याही प्रकारचे निर्बंध उठवण्यात आले नाही राज्य सरकारने जे जे काही निर्बंध घालून दिलेले आहे ते तसेच ठेवण्यात आलेले आहे जनता कर्फ्यू हा नगर शहरामध्ये लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून जे निर्बंध होते तेच कायम केले असल्याचे आयुक्त गोरे यांनी यावेळी सांगितले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post