जम्बो कोविड सेंटर उभारण्यास टाळाटाळ...कॉंग्रेसचे महानगरपालिकेत आक्रमक आंदोलन

 काँग्रेसचे आंदोलन सुरू झाले,  मनपा आयुक्तांच्या दालना समोर ठिय्या आंदोलन : काँग्रेसचे मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्या दालना समोर जोरदार ठिय्या आंदोलन सुरू आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली ऑक्सिजन मास्क लावून हे आंदोलन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सुरू केले असून पदाधिकारी संतप्त आणि आक्रमक आहेत. कोरोना संकटकाळात महाराष्ट्रात पदाधिकाऱ्यांच्या "बाबांनो, आता तरी ऑक्सिजन द्या रे" या मागणीसाठीच्या अशा प्रकारच्या आंदोलनाला सामोरे जायची नामुष्की आलेली, भाजपा - राष्ट्रवादी युतीची सत्ता असणारी अहमदनगर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका आहे.


सुरू असलेल्या आंदोलनाची कारणे :  

१. महसूल मंत्री महोदयांनी दिनांक २४ एप्रिल २०२१ रोजी कोरोना आढावा बैठकीमध्ये 1000 ऑक्सीजन बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्याबाबत आदेश देऊन देखील मनपा आयुक्तांनी अद्याप पर्यंत कोणतीच प्रगती त्यादिशेने केली नाही.


२. मनपा - काँग्रेस यांच्यात झालेल्या दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीत सदर जम्बो कोविड सेंटरचा विषय मार्गी लावण्यासाठी तातडीने बजेट तयार करत कृती केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता आपल्या दिलेल्या आश्वासनाला *मनपा आयुक्तांनी घूमजाव केले" असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 


३. काँग्रेसने मनपाच्या साहाय्याने ऑक्सिजन बेड सेंटर निर्माण करण्यासाठी ची जबाबदारी उचलण्यासाठी मनपाला प्रस्ताव दिला होता. आधी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन देणाऱ्या मनपाने यालाही खोडा घालत हात वर केले आहेत. काँग्रेसने   अराजकीय व्यासपीठाच्या (नगर विकास मंच) माध्यमातून त्यासाठीचा लेखी प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अखत्यारीत असणाऱ्या क्रीडा हॉस्टेलची (एक युनिट सुरू करण्यासाठी) मान्यता या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मिळावी यासाठी अर्ज केला होता. मात्र यावर अधिकारीस्तरावर काल सायंकाळी चर्चा झाली असता मनपा आयुक्तांनी महानगरपालिकेच्या विचाराधिन असा कोणताही प्रकल्प नसल्याचे म्हटल्याची बातमी बाहेर आल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी यांनी आयुक्तांच्या घुमजाव करीत केलेल्या खोटारडेपणावर तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन सुरू केले आहे.


४. किरण काळे यांनी म्हटले आहे की,  मनपाच्या माध्यमातून विनाकारण घाणेरडे राजकारण सुरू असून खरे झारीतील शुक्राचार्य, पडद्यामागून आडवा पाय घालणारे, संकट काळात निव्वळ राजकीय द्वेषातून नगरकरांच्या जीवावर उठलेले दुसरे - तिसरे कोणी नसुन दस्तुरखुद्द  शहराचे आमदार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post