नगर तालुक्यातील आणखी एका गावात कडक जनता कर्फ्यु... वाचा सविस्तर

नगर तालुक्यातील आणखी एका गावात कडक जनता कर्फ्यु... वाचा सविस्तर

 ७ दिवसांचा जनता कर्फ्यू   

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आज झालेल्या कोरोना ग्रामसुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये चिचोंडी पाटील गावामध्ये दिनांक ४ मे च्या मध्यरात्री १२.०० पासून ते दिनांक ११ मे रोजीच्या रात्री १२.०० वाजेपर्यंत कडक जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


तरी सर्व ग्रामस्थांनी व व्यावसायिकांनी सदर जनता कर्फ्यूस सहकार्य करून गावातील कोरोना परस्थिती हाताळण्यासाठी गाव पातळीवरील प्रशासनास सहकार्य करावी.


सदर जनता कर्फ्यू हा फक्त नावापुरता नसून जनता कर्फ्यूचे पालन न करणाऱ्या ग्रामस्थांवर व व्यावसायिकांवर ग्रामपंचायत, चिचोंडी पाटीलच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.


सदर जनता कर्फ्यूच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा मदत लागण्यास आपल्या भागातील ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामपंचायत प्रशासनास  संपर्क करावा ही विनंती.


धन्यवाद...

ग्रामपंचायत, चिचोंडी पाटील

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post