कोरोनाला गावाबाहेरच रोखण्यात ग्रामस्थ यशस्वी..."या'' गावच्या पॅटर्नची राज्यात चर्चा....!

 कोरोनाला गावाबाहेरच रोखण्यात ग्रामस्थ यशस्वी ; 

नेवासा तालुक्यातील "या'' गावच्या पॅटर्नची राज्यात चर्चा....!नेवासा-- नेवासा तालुक्यातील चिंचबन गावात बाहेरुन येणा-या व्यक्तीला गावबंदी, विलगीकरण, सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी, गावातील भाजीपाला उत्पादक शेतक-यांकडून गावातच विक्री, दुस-या गावांतून येणा-या भाजीपाला व किराणामाल विक्रेत्यांना मनाई आदी उपाययोजनांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी एकजूटीतून कोरोनाचा गावात शिरकाव होऊ दिला नाही.

गावची लोकसंख्या ७५० ते ८०० असून गावात मुख्यत्वे शेतकरी, शेतमजूर, दलित व आदिवासी कुटुंबे आहेत. शेतकरी प्रामुख्याने ऊस, गहू, केळी इ. पिके घेतात. बारमाही बागायती शेती असल्याने गांव सधन आहे. बहुतांशी शेतकरी वर्ग स्वत:च्या शेतातच घरे बांधून राहत आहेत. गावांत सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजना असून बहुतांशी ग्रामस्थांकडे वैयक्तिक नळ कनेक्शन आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग व प्रसार होत नाही. ग्रामस्थांनी वज्रमूठ करुन तालुक्याचे ठिकाणी जायचे नाही असा निर्धार केला आहे. 

चिंचबन गांव तालुक्यापासून अवघ्या ३ कि.मी. अंतरावर असून छोटे गांव आहे. गावांत आरोग्य केंद्र नाही. लसीकरण कार्यक्रमांची मात्र आजपर्यंतही सुविधा उपलब्ध्‍ा झालेली नाही. लसीचा तालुका  आरोग्य केंद्रात तुटवडा असल्याने बहूसंख्य  ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित आहेत.

     गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी गावातले युवा वर्ग प्रामुख्याने पुढाकार घेत आहे. चिंचबन मिञमंडळाचे सदस्य भाऊसाहेब शिंदे, सुनिल चव्हाण, अजित चव्हाण, राहुल डौले, अशोक थिटे, संजय जाधव, अरुण जाधव, संजय शिंदे, शंकर माळी यांसह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, उपसरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती समितीचे प्रमुख दत्ताञय मापारी, ग्रामपंचायत कर्मचारी व आशा आरोग्यसेविका यांचे याकामी सहकार्य मिळत असून गांव सतत कोरोनामुक्त ठेवण्याचा पक्का निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post