'छावा'ने पाठविला राज्य सरकारला साडी चोळी बांगडी आहेर

 अखिल भारतीय छावाने पाठविला राज्य सरकारला साडी चोळी बांगडी आहेर 

मराठा समाजास आरक्षण दया, अन्यथा उग्र स्वरूपात आंदोलन - पटारे.गेल्या ३५ वर्षांचा प्रदीर्घ लढा, लाखोंच्या संख्येने, शांततेत निघालेले मूक मोर्चे, या नंतर तत्कालीन युती सरकारने मराठा समाजास आरक्षण जाहीर केले, मात्र आरक्षणा विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिके विरोधात, महाविकास आघाडी सरकारला, हे आरक्षण टिकविता आले नाही, त्याच बरोबर केंद्र सरकारने, राज्य सरकारचे अधिकार काडून घेतल्यामुळे देखील, सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाचे आरक्षण टिकले नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याचा निर्णय दिला, न्यायलायाच्या या निर्णयानंतर, अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने, केंद्र व राज्य सरकारला प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत साडी,चोळी व बंगडीचा आहेर देण्यात आला, यावेळी  छावाचे जिल्हा अद्यक्ष नितीन पटारे , प्रदेश संघटक सुभाष जंगले सर,  , तालुकाअध्यक्ष निलेश बनकर शेतकरी आघाडीचे विजय सलालकर,शहर अध्यक्ष शरद बोबले,शाखा अध्यक्ष दत्ता कसबे ,संघटक अक्षय पटारे ,बाळासाहेब उंडे,अशोक अभंग ,दौलत गायकवाड,किरण गुंजाळ ,गणेश धुमाळ, मच्छिंद्र कोकणेआदी उपस्तीत होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post