जुगाड नंबर 1...लसीकरण केंद्रावर चपलांच्या रांगा...

जुगाड नंबर 1...लसीकरण केंद्रावर चपलांच्या रांगा...वाशिम  : कामरगाव येथील लसीकरण केंद्रावर सध्या पात्र असलेल्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस दिला जात आहे. दरम्यान, एकाचवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी आरोग्य विभागाने टोकन पद्धत अंगीकारण्यात आली आहे. दुसरीकडे १६ मे रोजी दुसरा डोस घ्यायला आलेल्या नागरिकांनी उभे राहून पाय दुखवून घेण्यापेक्षा उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी झाडांच्या सावलीचा आधार घेतला. याचवेळी रांगेतून नंबर कटू नये, यासाठी चक्क चपलांचीच रांग लावण्यात आल्याचे पाहावयास मिळाले.१६ मे रोजी लसीकरण केंद्रावर लसीचा दुसरा डोस मिळणार असल्याची माहिती मिळाल्याने नागरिकांनी सकाळपासून केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. दुपारच्या सुमारास उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी काही लोकांनी रांगेत चपला ठेवून झाडाच्या सावलीचा आधार घेतल्याचेही पाहावयास मिळाले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post