शेतकऱ्यांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा चक्रीवादळाचा इशारा

 शेतकऱ्यांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा चक्रीवादळाचा इशारा, मान्सूनवर परिणाम होणार?मुंबई : अरबी समुद्रात येत्या आठवड्यात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने येत्या 16 मे रोजी चक्रीवादळ धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. जर हे चक्रीवादळ आलं तर मान्सूनवर देखील परिणाम होणार आहे. सर्वसाधारणपणे मान्सूनचं केरळात 1 जूनला आगमन होतं. 

भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार पूर्वमध्य समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे वादळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. 14 मे ते 16 मे दरम्यान समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post