रूग्णसंख्या घटल्याने ‘या’ जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु

बुलढाणा जिल्ह्यात 20 मे पासून अनलॉक प्रक्रिया 



बुलढाणा : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या रुग्णसंख्येत आता काहीशी घट होताना दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात 20 मे पासून अनलॉक प्रक्रिया सुरु करण्यात येत असून अनेक निर्बंधात शिथिलता आणण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी रामामुर्ती यांनी स्पष्ट केलंय. या संबंधी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे एक परिपत्रक काढण्यात आलं आहे. हे नवीन नियम 20 मे सकाळी 6 वाजल्यापासून ते 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असतील. 


या नव्या नियमांनुसार, जिल्ह्यातील सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा मालाची दुकाने तसेच स्वस्त धान्यांची दुकाने सकाळी 7 ते 11 वाजायच्या दरम्यान सुरु राहतील. भाजीपाला आणि फळविक्रीही सकाळी 7 ते 11 वाजण्याच्या दरम्यान सुरु राहतील. दुध व दुग्धजन्य पदार्थाची विक्री ही सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 9 या दरम्यान सुरु राहणार आहे. तसेच सर्व प्रकारच्या कृषी सेवा केंद्र आणि कृषी निविष्ठांची दुकाने, कृषी प्रक्रिया उद्योग, शेती अवजारे आणि शेतीतील उत्पादनांशी संबंधित दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. या बाबतचे नियोजन हे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी करायचे आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post