जेव्हा पोलिस निरीक्षकच देतात कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे .

 जेव्हा पोलिस निरीक्षकच देतात कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे .
नेवासा - प्रतिनिधी गणेश मुळे   ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत नेवासा तसेच नेवासा फाटा तेथे कडक निर्बंध जारी करून प्रशासनाने  आता नागरिकांना शिस्त लावण्याची जय्यत तयारी केली आहे.त्यामुळे नेवासा फाटा येथे पंधरा मेपासून आठ दिवस तर नेवासा शहरात पंधरा दिवस अशा कडक लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे.


परंतु लॉक डाऊनच्या पहिल्याच दिवशी दुचाकीस्वार मात्र कुठल्याच प्रकारची धास्ती नसल्याचे चित्र नेवासा फाटा येथे पाहावयास मिळत आहे .त्यामुळे त्यांना आळा घालण्यासाठी नेवासा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक  विजय करे  यांनी आपल्या फौजफाटय़ासह  नेवासा फाट्यावरील आंबेडकर चौकात मोकाट फिरणार्या नागरिकांवर आणि दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यास सुरूवात केली.त्यामुळे विनाकारण फिरणार यांची मात्र चांगलीच भंबेरी उडाली.यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.तसेच "मेडिकल किंवा दवाखान्यामधे जर कुणी जात असेल तर त्यांना चौकशी करून जाऊ द्या जास्त वेळ अडवु नका"  असे भावनिक आदेश यावेळी पोलिस निरीक्षक विजय करे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिले . या वेळी अमोल बूचकूल,राजू काळे,आदि पोलिस कर्मचार्यांसह मुकिंदपूर ग्रामपंचायत कर्मचारी, होमगार्ड ,आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post