पारनेर तालुक्यात आणखी एक कोविड सेंटर कार्यान्वीत, ग्रामस्थांनीच घेतला पुढाकार

पारनेर तालुक्यात गोरेगाव येथे कोविड सेंटर कार्यान्वीत, ग्रामस्थांनीच घेतला पुढाकार पारनेर : तालुक्यातील गोरेगाव येथे वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी कोविड सेंटर उभारले आहे. त्यात तपासणी ते उपचारापर्यंतच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

गोरेगाव येथे रुग्णसंख्या वाढत असल्याने गावात जास्तीत जास्त टेस्टिंग करण्याचा निर्णय घेतल्याचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी सांगितले. लोकांना वैद्यकीय सेवेशिवाय इतर कारणासाठी फिरण्यास कडक निर्बंध घातले. ज्यांचा टेस्ट रिझर्ल्ट पॉझिटिव्ह येईल त्यांना जिथे शक्य असेल तेथे सरकारी, खासगी हॉस्पिटलमध्ये, कोविड सेंटरमध्ये, सौम्य लक्षणे असतील, सॅच्युरेशन लेव्हल चांगली असेल त्यांना शाळेत थांबण्यास सांगितले. त्रास नसेल तरी घरी उपचार घेण्यास १०० टक्के मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी जनजागृती करण्याचे काम सर्व टीम करत आहे. पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्या लोकांना टेस्टिंगसाठी प्रवृत्त केले जात असल्याचे तांबे यांनी सांगितले.

बाबासाहेब तांबे मित्रमंडळाच्यावतीने शाळेत कोरोना कक्षातील तसेच विलगीकरणातील नागरिकांना मिनरल वॉटर, दोन वेळ चहा, नाश्ता, दुपारचे अन् संध्याकाळचे जेवण, एक व्यक्ती एक पॅकिंग असे स्वतंत्र दिले जात आहे. त्यामुळे त्यांचा एकमेकांशी किंवा बाहेरील व्यक्तींशीही संपर्क होत नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत हे अन्न पोहोच केले जाते. सर्व रुग्णांना एक खजूर पॅकेट, सॅनिटायझर, नॅपकिन, साबण, ब्रश, टूथपेस्ट, असे प्रत्येकी एक कीट दिले गेले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post