'ज्ञानदा प्रतिष्ठान' तर्फे प्लाझ्मा संकलन मोहीम

प्लाझ्मा संकलन मोहीम
 *ज्ञानदा प्रतिष्ठान* तर्फे प्लाझ्मा संकलन मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये आपण प्लाझ्मा दान करू शकता व आपण ज्या रुग्णाला प्लाझ्मा दान करताल त्या व्यक्तीस आपण तो बरा झाल्यावर झाडे लावून संगोपन  करण्यास सांगितले जाईल अशा प्रकारे आपली साखळी पुढे चालत राहील. जेणेकरून  झाडे पण लावली जातील. 

*प्लाझ्मा दान कोण करू शकतो व कोण करू शकत नाही*

१) ज्यांचे वय १८ ते ६० दरम्यान आहे. 

२) ज्यांचे वजन ५० किलो पेक्षा जास्त आहे. 

३) जी व्यक्ती कोरोना आजारातुन पूर्ण बरी झालेली असून डिस्चार्ज किंवा होमकोरोनटाईनच्या सुमारे २८ दिवसा  नंतर प्लाझ्मा दान करू शकतात. 

४)आयुष्यात किमान एकदा तरी रक्तदान केलेले पाहिजेत 

५)गर्भवती स्री प्लाझ्मा दान करू शकत नाही

६)ज्या व्यक्तीला डायबेटिस आहे त्या प्लाझ्मा दान करू शकत नाही

७)कोरोना आजारातून संपुर्णत: बारी झालेली व्यक्ती सुमारे ३/४ महिन्यापर्यंत प्लाझ्मा दान करू शकतात. 

८)एकदा प्लाझ्मा  दान केल्यानंतर आपण ७ ते १५ दिवसानंतर पुन्हा दान करू शकता.

 कोणतेही दुष्परिणाम होत नाही. रक्तदात्याने दान केलेल्या प्लाझ्मा शरीर काही तासात पुन्हा बनवत असते. 

  कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या व्यक्तीमध्ये कोरोना विषाणू विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार झालेली असल्यामुळे प्लाझ्मा  दान केल्याने गंभीर रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत उपयोगी असते. 

प्लाझ्मा दान केलेल्या दिवसापासून सुमारे एक वर्षापर्यंत ते साठवले जावू शकतात.

*प्लाझ्मा दान करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी*

१) योग्य पौष्टिक आहार , पुरेशी झोप आणि शक्यतो द्रव पदार्थ सेवन जास्त करावे. 

२) स्वताला सध्या आणि पूर्वी असलेल्या आजाराबद्दल आणि सध्या सुरू असलेल्या औषधाबद्दल डॉक्टरांना संपूर्ण माहिती द्यावी. 

*आपण प्लाझ्मा दान केल्याने एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकते.*

*झाडे लावा झाडे जगवा* या संकल्पनेप्रमाणे *माणूस वाचवा माणूस जगवा* हि संकल्पना देखिल ज्ञानदा प्रतिष्ठान च्या माध्यमातून आपण राबवणार आहोत यातुन आपणांस सामाजिक कर्तव्य पार पाडता येईल येवढेच नाही तर भविष्यात आपल्या जवळच्या माणसाचे देखिल प्राण वाचणार आहेत या मुळे *ज्ञानदा प्रतिष्ठान* आपणांस आवाहन करत आहे कि

बेड पाहिजे प्लाझ्मा पाहिजे

जसे मेसेज आणि फोन करतो 

तसेच मी कोवीड मधून बरा झालो आहे मी प्लाझ्मा देण्यास तयार आहे असा पण मेसेज करा

तुमचा प्लाझ्मा दुसऱ्या कोवीड रुग्ण चा जीव वाचवु शकतो..🙏🏻 

ज्याला कोणाला प्लाझ्मा दान करायचा आहे त्यांनी ज्ञानदा  प्रतिष्ठानला संपर्क करावा आम्ही आपली मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहचवू 

आपले ...

 *ज्ञानदा प्रतिष्ठान अहमदनगर* 


संपर्कः१) सचिन हिरवे :- ९९२११६०१६६,९४०४८८३६९६

२) संदीप दळवी :- ९२२६७७२०४२

३) शिवाजी पठारे :- ९७३०९७८८९१

४) अमोल जाधव :- ९६८९२५१५१५

५) जयदीप पादिर :- ९७६६१५६१६४

६)ज्ञानेश्वर बर्वे :- ९७३०९८९००४ 

७) विश्वास चेडे :- ९८५००१३३३०

८) महेश सोनूले :- ९८८११९३६१९

९) शेखर पुंड :- ८६२४९८३३३३

१०)स्वप्निल गवळी :- ८४८३८८६५५६

११)वैभव भोंग :- ९९७५९१६०३०


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post