खारीचा वाटा....वाढदिवसाचा खर्च टाळून चिमुरडीची कोविड सेंटरला आर्थिक मदत

 

खारीचा वाटा....वाढदिवसाचा खर्च टाळून चिमुरडीची कोविड सेंटरला आर्थिक मदत, आ.रोहित पवार यांनी केले कौतुकनगर: करोना विरूद्ध लढाईत संपूर्ण देश एकजुटीने लढत आहे. विविध ठिकाणी सुरू असलेल्या कोविड सेंटरला दानशूर मंडळी मदत करत आहेत. या जोडीला लहान मुलेही खारीचा वाटा उचलून या महामारीत संवेदनशीलता दर्शवत आहेत. कर्जत तालुक्यातील कोळवाडी येथील नेहा सुनील क्षीरसागर हिने आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून कर्जतच्या  कोविड सेंटर साठी २१०० रुपयांची मदत दिली आहे. आ. रोहित पवार यांनी ट्विट करत या चिमुरडीच्या सामाजिक जणीवेच कौतुक केले.

आ.पवार यांनी म्हटले आहे की, 

माझ्या मतदारसंघातील कोळवडी (ता. कर्जत) इथले सुनील क्षीरसागर यांनी त्यांची मुलगी कु. नेहा हिच्या वाढदिवसाचा खर्च टाळून २१०० ₹ ची मदत कर्जतच्या कोविड सेंटरला दिली. नेहा आणि तिच्या वडिलांच्या या सामाजिक जाणीवेचा प्रचंड आदर वाटतो! तिला वाढदिवसानिमित्त माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post