हनीट्रॅप प्रकरण....नगर तालुक्यातून आणखी एकाला अटक

हनीट्रॅप प्रकरण....नगर तालुक्यातून आणखी एकाला अटकनगर -  नगर तालुक्यातील हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढत असून पोलिसांनी नगर तालुक्यातील हिंगणगाव येथील  बापू सोनवणे याला पोलिसांनी अटक केली आहे. 

नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनी ट्रॅप प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणामध्ये आता बापू सोनवणे (राहणार हिंगणगाव) याला अटक करण्यात आली आहे. बापू सोनवणे हा व्यवसायिक असून, त्याने त्या महिलेची साथ देऊन इतरांना फसविण्याचा प्रकार केला आहे. हे तपासामध्ये उघड झाल्यानंतर नगर तालुका पोलिसांनी बापू सोनवणे याला त्याच्या घरातून अटक केली आहे. तसेच त्याची चार चाकी आलिशान गाडी सुद्धा पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post