महागाईच्या मुद्यावर राष्ट्रवादीचे आंदोलन

 महागाईच्या मुद्यावर राष्ट्रवादीचे आंदोलनपाथर्डी : वाढलेल्या महागाईला केंद्र सरकार जबादार असून त्याचा पाथर्डी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तहसिल कार्यालयासमोर घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. केंद्राने  डिझेल ,पेट्रोल,घरगुती गॅस खतांच्या दारात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे.महागाईत  चांगली वाढ झाली आहे.  सामान्यांपासून तर शेतकऱ्यापर्यंत यात भरडले जात आहे. केंद्र सरकार दुहेरी आर्थिक लूट करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने करत आज दुपारी नायब तहसिलदार पंकज नेवसे यांच्याकडे निवेदन सुपूर्त करण्यात आले . 

 . माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे,बंडू पाटील बोरुडे ,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे,प्रा दिगंबर गाडे ,योगेश रासने,देवा पवार,चंद्रकांत मरकड,विनय बोरुडे,शुभम वाघमारे,बाळासाहेब ताठे,वैभव दहिफळे ,चांद मणियार आदीच्या निवेदनावर सह्या आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post