करोना रूग्णाची रूग्णालयातच आत्महत्या, नातेवाईकांनी हॉस्पिटलवर केले गंभीर आरोप

करोना रूग्णाची रूग्णालयातच आत्महत्या, नातेवाईकांनी हॉस्पिटलवर केले गंभीर आरोप

 


बीड  - कोरोना संक्रमित रुग्णाने हॉस्पिटलमध्येच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे, रुग्ण आत्महत्या करत असताना घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासन काय झोपले होते का? असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, कुटुंबातील 35 वर्षीय तरुणाला गमावलेल्या कुंटुंबियांनी न्यायाची मागणी करत त्याचा मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. बीड शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्या केलेला तरुणाचे नाव रामलिंग महादेव सानप असे होते. हॉस्पिटल व्यवस्थापन बिलासंदर्भात रुग्णाला वारंवार विचारणा करत होते, त्यामुळेच माझ्या पतीने आत्महत्या केल्याचा आरोप मयत रामलिंग याच्या पत्नीने केला आहे. दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाने नातेवाईकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post