सिद्धी फौंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर...कोरोनामुळे चालवणार वर्षभर अभियान

 सिद्धी फौंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर

51 जणांनी केले रक्तदान : कोरोनामुळे चालवणार वर्षभर अभियान 


पुणे : प्रत्येक वर्षी २१ मे रोजी हजारो बाटल्या रक्त संकलित करून पुणे शहराची उन्हाळ्यात रक्ताची गरज भागवणाऱ्या सिद्धी फौंडेशनने या वर्षी कोरोनामुळे फक्त 51 बाटल्या रक्त संकलित करून हे अभियान वर्षभर चालवणार असल्याचे जाहीर केले.
      मागील अनेक वर्षांपासून स्व. मदनलाल छाजेड यांच्या स्मरणार्थ सिद्धी फौंडेशनच्या वतीने २१ मे रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असते. त्यांच्या या शिबिरामुळे मे व जून महिन्यात जो रक्ताचा तुटवडा शहरात निर्माण होतो तो भरून निघत असतो. मात्र या वर्षी कोरोनामुळे त्यांना हे शिबिर आयोजित करता आले नाही. मात्र मानवसेवेच्या कार्यात मागे हटायचे नाही हा निर्धार केलेल्या सिद्धी ग्रुपच्या सर्व सद्स्यांनी या वर्षी लागेल तेंव्हा रक्तदान शिबिर अशा प्रकारचे आयोजन केले आहे. त्यांच्याकडे हजारो रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचा डेटा आहे. अनेक ब्लड बँकसोबत त्यांनी याची बोलणीदेखील करून ठेवली आहे. त्यामुळे ते वर्षभर लागेल तेव्हा रक्तदान आयोजित करणार आहेत.
      आपल्या शिबिराची परंपरा अखंडित ठेवण्यासाठी त्यांनी त्यांच्या परिवारातील काही सद्स्यांनी व मित्रांनी मिळून दोन ठिकाणी 51 बाटल्या रक्तदान केले. या वेळी सिद्धी फौंडेशनची पुढची पिढी म्हणजेच सिद्धी छाजेड, सिद्धांत छाजेड, लोकेश जैन यांनी पुढाकार घेत या शिबिराचे आयोजन केले होते. सिद्धी ग्रुपचे प्रमुख मनोज छाजेड, ललित जैन, योगेश मोहळ, मुकेश छाजेड, जीवन बैद, योगी चोरडिया, उमेश पाथरकर, भरत सुराणा, संतोष भुरट यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post