मोठी बातमी.... लसीकरण केंद्र शोध व तक्रारींसाठी मनपाकडून व्हाटस्अप क्रमांक जारी

 लसीकरण केंद्र शोध व तक्रारींसाठी मनपाकडून व्हाटस्अप क्रमांक जारीनगर : नगर शहरात महापालिकेच्या केंद्रांवर लसीकरण सुरू असले तरी ऑनलाईन नोंदणी करूनही बुकिंग स्लॉट नक्की होतं नाही अशा तक्रारी वाढल्या आहेत. लसीकरण केंद्रांवर गेल्यावर अनेकदा तासोनतास रांगेत थांबूनही लस मिळत नाही. या पार्श्वभूमीवर नगर महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी व्हाटस् अप क्रमांक जाहीर केला आहे. लसीकरण केंद्र तसेच लसीकरण संदर्भातील तक्रारी या क्रमांकावर नोंदवता येतील असे मनपाने कळवले आहे.

मनपाचे व्टिटमध्ये म्हटले आहे की, 

लसीकरण केंद्र शोधण्यासाठी अथवा काही तक्रार असल्यास [+९१]९०१३१५१५१५ हा व्हॉटस्अ‍ॅप नंबर आपल्याकडे सेव्ह करा आणि यावर आपली तक्रारनोंदवा.लसीकरणाबाबत गैरसमज करुन घेऊ नका लसीकरण करुया,कोरोनाला हरवूया...

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post