प्रभाग क्रमांक १३ मध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावे

 प्रभाग क्रमांक १३ मध्ये लसीकरण सुरु करण्यात यावे

उपसभापती सुवर्णा गेनाप्पा यांची मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे मागणी नगर - प्रभाग क्रमांक १३ हा शहराच्या मध्यवस्ती ठिकाणी असून त्याची व्याप्ती इतर प्रभागाच्या तुलनेत अतिशय मोठी आहे . आमच्या प्रभागामध्ये जेष्ठ नागरिक यांची संख्याही जास्त आहे परिणामतः प्रभागाजवळ असणारे एकमेव लसीकरण केंद्र ( महात्मा फुले लसीकरण केंद्र ) हे फार तोकडे पडत आहे . नागरिकांना लसीकरणासाठी ऐन मे महिन्यात उन्हात ताटकळत बसावे लागते .त्यामुळे तिथे प्रचंड प्रमाणात गर्दी होत असून सहाजिकच कोरोना प्रतिबंधक नियमांचा फज्जा उडत आहे . माझ्या प्रभागातील नागरिकांसाठी सुयोग मंगल कार्यलय ,कोर्टगली  या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्याची मला परवानगी द्यावी ज्या केंद्रावर कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही व अतिशय शिस्तबद्ध रीतीने लसीकरण राबवण्यात येईल याची मी शास्वती देते . या करीता मी स्वतः व संतोष  गेनाप्पा  उपशहरप्रमुख शिवसेना व आदर्श युवक मंडळ चे सर्व स्वयंसेवक अहोरात्र मेहनत घेण्यास तत्पर आहोत.  अशी मागणी त्यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांचे कडे केली आहे वरील निवेदनाचे प्रत जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले ,मनपा आरोग्य अधिकारी डॉ अनिल बोरगे यांना देखील देण्यात आले आहेत . 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post