पारनेर प्रशासकीय यंत्रणेचे डोके ठिकाणावर आहे का ?- सुजित पाटील झावरे

 पारनेर प्रशासकीय यंत्रणेचे डोके ठिकाणावर आहे का ?- सुजित पाटील झावरेजगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना या आजाराने पारनेर शहराला सुद्धा अजिबात सोडले नाही. पारनेर मध्ये रोजच कमीत कमी पाच मृत्यू या कोरोना आजाराने होत आहेत. त्यातच कोरोनाच्या लसीकरणाने एक आशेचा किरण निर्माण केला होता, पण या लसीकरणाचा हि कुठलाही फायदा पारनेर शहरवासीयांना होणार नाही. अर्थशास्त्राप्रमाणे 18 ते 45 हा वयोगट खऱ्या अर्थाने कमवता वयोगट असतो परंतु या वयोगटाचे लसीकरण पारनेर या तालुक्याच्या ठिकाणी होणार नसून ते टाकळी ढोकेश्वर याठिकाणी होणार आहे, परंतु हा जो निर्णय आहे तो न पटणारा आहे कारण की
1) पारनेर शहरामध्ये पाच दिवसांचा कडक लॉकडाउन लावलेला आहे त्यामुळे घराबाहेर पडणेही मुश्कील आहे मग टाकळीढोकेश्वरला कसे जाणार.
2) सरकारी असणारी बस व्यवस्था सुद्धा पूर्णपणे बंद आहे
3) खाजगी वाहतूकही पूर्णपणे बंद आहे
4) सर्वांकडेच चारचाकी वाहन नाही.
5) दुचाकी वर जाण्याचा जर प्रयत्न केला तर पोलीस प्रशासन त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असेल.
6) ज्यांच्याकडे वाहन नाही त्यांनी काय करायचे
7) बाहेर जिल्ह्यातून किंवा बाहेर गावातून आलेल्या मोलमजुरी करणाऱ्या लोकांनी काय करायचे.
याचा अर्थ हे लसीकरण पारनेर करांची थट्टा करण्यासाठीच नव्हे ना?
पर्याय
जर प्रशासनाने आयटीआयची संपूर्ण इमारत ताब्यात घेऊन त्या ठिकाणी जर 18 ते 44 या वयोगटाचे लसीकरण केले असते तर पारनेर शहरातील सर्वसामान्य माणूस अगदी सहज पायी जाऊन सुद्धा ही लस घेऊ शकला असता.
यामध्ये कुठलेही राजकारण नाही पण प्रशासन हे लोकांची मदत करण्यासाठी असते नाकी लोकांची गैरसोय करण्यासाठी.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post