राज्य सरकारचा मोठा निर्णय.. पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्त स्थगिती

पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्त स्थगिती मुंबई :  मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्त स्थगिती देण्यात आली आहे.  7 मे रोजी राज्य सरकारने जीआर जारी करत पदोन्नतीत आरक्षण रद्द करायचा निर्णय घेतला होता. यावरून आरक्षित वर्गात नाराजीचे सूर उमटले होते.  सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे 2004 सालापासून पदोन्नतीची रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरली जाणार आहेत, असा आदेश जारी करण्यात आला होता. या निर्णयाला आज स्थगिती देण्यात आली. दरम्यान या निर्णयानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली हे मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post