शेतकर्‍यांचे नुकसान थांबविण्यासाठी नगर बाजार समितीची प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी


बाजार समिती बंदमुळे शेतीमालाचे मोठे नुकसान  
नगर बाजार समितीतील बाजार सुरू करण्यासाठी निवेदन


नग :  जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे नगर बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत . यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान होत असुन कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून बाजार समितीतील शेतीमालाचे व्यवहार सुरू करण्याची बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे .
यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , सध्या कोरोना संसर्ग नियत्रंणात आणण्यासाठी सर्व बाजार समितीमधील शेतमालाचे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद करण्यात आले आहेत . यामुळे नगर बाजार समितीच्या मुख्य आवारातील फळे , भाजीपाला , अन्नधान्य व इतर  व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत . सध्या वादळी वारा व पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान होत आहे .बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच खराब होत असुन यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे .
सध्या खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्री करून -बियाणे , खते , औषधे , शेती अवजारे  वेळेत मिळणे गरजेचे आहे . यामुळे बाजार समितीच्या मुख्य आवारातील फळे , भाजीपाला व भुसार माल तसेच नेप्ती उपबाजारातील फळे , भाजीपाला व कांदा व्यवहार सुरू केल्यास शेतकऱ्यांच्या शेतीमालाची विक्री हाईल .आलेल्या पैशातुन शेतकरी खते बियाणे , शेती पुरक अवजारे यांची खरेदी करतील . कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करून वेळेची मर्यादा घालुन देऊन बाजार समितीतील खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू करण्याची मागणी सभापती घिगे यांनी केली आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post