कल्याण रोड परिसरात मनपाचे लसीकरण केंद्र, नगरसेवक सचिन शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

 कल्याण रोड परिसरात मनपाचे लसीकरण केंद्र सुरू

नगरसेवक सचिन शिंदे यांच्या पाठपुराव्याला यशनगर- *कोरोना कोव्हिड- या संसर्गजन्य रोगांच्या लासिकरणासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये.तसेच आरोग्य अधिकारी ,कर्मचारी व सर्वसामान्य नागरिक यांच्या मध्ये वादविवाद होऊ नये व लसीकरण मोहीमेला वेग यावा तसेच कल्याण रोड परिसरातील कोणताही नागरिक लासिकरणा पासून वंचित राहू नये. याकरिता नगरसेवक सचिन  शिंदे यांनी, अहमदनगर महापालिका आयुक्त व आरोग्य अधिकारी यांच्याकडे कल्याण रोड परिसरात लसीकरण केंद्र चालू करण्याची मागणी केली होती.महापालिका प्रशानाकडून या मागणीची दखल घेऊन कल्याण रोड परिसरासाठी सवतंत्र लसीकरण केंद्र पूनम सांस्कृतिक भवन येथे सुरू  करण्यात आले आहे.तरी 45 वर्षा पुढील ज्या नागरिकांचे अजूनही लसीकरण झालेले नाही.त्यांनी या लसीकरण मोहीमेत सहभागी व्हावे व लसीकरण करून घ्यावे ही विनंती.*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post