मोठी बातमी... तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर गंभीर परिणाम होतील असे....

मोठी बातमी... तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर गंभीर परिणाम होतील असे कुठलेही संकेत नाहीत नवी दिल्लीः करोना दुसरी लाट आता हळहळू ओसरत आहे. अशातच आता दिलासा देणारी एक बातमी आली आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांवर गंभीर परिणाम होतील असे कुठलेही संकेत  नाहीत, असं सरकारने म्हटलं आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक संसर्ग होऊ शकतो, असं आधी सांगण्यात येत होतं.

"मागच्या काही शक्यता तपासून लहान मुलांना करोनाची लागण होईल असं सांगण्यात येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग झाला नव्हता. त्याचबरोबर त्यांना लसही देण्यात आलेली नाही. त्यामुळे तसा अंदाज बांधला जात आहे. मात्र त्याला कोणताच पुरावा नाही", असं एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं. "करोना काळात मानसिक तणाव, स्मार्टफोनचं व्यसन आणि अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी यामुळे मुलांना त्रास होऊ शकतो", असंही त्यांनी पुढे सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post