करोना काळात गरजूंच्या जेवणापासून ते प्लाझमा दानपर्यंत ‘वर्ल्ड मराठा’चे योगदान

 

करोना काळात गरजूंच्या जेवणापासून ते प्लाझमा दानपर्यंत ‘वर्ल्ड मराठा’चे योगदानबाहेरगावाहून उपचारासाठी नगरला येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांचे जेवनाचे होणारे हाल या शिवाय बाहेरून आलेल्या पोलीस परिचारिका कारोनायोद्धे यांचाही जेवणाचे हाल होतात. यासाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ने छत्रपती संभाजी महाराज जन्म उत्सवानिमित्त मोफत टिफिन सुरू केली असून आत्तापर्यंत दोन दिवसांमध्ये 300 लोकांनी याचा लाभ घेतला आहे शनिवारी एका दिवसात 150 डबे पोच करण्यात आले आहे  वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन WMO यांचे अहमदनगर जिल्ह्यामध्ये 31 व्हाट्सअप ग्रुप आहेत.

 टीमचे प्रबंधक प्रवीण थोरात, सचिन रेडे ,संकेत नरसाळे ,अभिजीत शेळके ,अजय थोरात, प्रशांत काळे, शिवाजी चव्हाण, संभाजी दहातोंडे इत्यादी पदाधिकारी व त्यांच्या सोबतीला हात देऊन चालणारे स्वयंसेवक संदिप कुलट, दीपक वाकचौरे, संदीप वाकचौरे ,भागेश सव्वाशे ,अक्षय रोमन ,कानिफनाथ मुर्दाडे , अनुप शिंदे ,सागर निर्मळ,आदी सहकार्य करीत आहे. 

 15 ठिकाणी रक्तदान
WMO अहमदनगर टीम कडून गेल्या 1 वर्षभर 15 ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना ग्रस्तांना बेड मिळवून देणे ऑक्सिजन व्हेंटिलेटर मिळवून देणे आदी कामे संघटनेच्यावतीने केली जात आहेत याशिवाय रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी एकाच दिवशी 15 ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन च्या माध्यमातून अध्यक्ष प्रवीण पिसाळ अवधूत सूर्यवंशी,प्रविण थोरात यांच्या पुढाकाराने ऑक्सीजन बेड व्हेंटिलेटर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत यासाठी ग्रुप चा प्रत्येक मेंबर्स मदत ज्याच्या त्याच्या परीने मदत करतो आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यामध्ये 200 पेक्षा अधिक लोकानी ग्रुप च्या माध्यमातून प्लाजमा दान केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post