कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार...येत्या काळात कांदा दर वधारण्याची चिन्हे

कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार...येत्या काळात कांदा दर वधारण्याची चिन्हे आगामी काळात कांद्याच्या  दरामध्ये दर वाढ होण्याचे संकेत मिळत असून याची सुरुवात जून महिन्यात होण्याची शक्यता असल्याचे मत राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व  प्रसिद्ध कांदा व्यापारी सुरेश बाफना यांनी व्यक्त केले. 

ते पुढे म्हणाले, यावर्षी कांद्याच्या सरासरी उत्पन्नात 40 ते 50 टक्के घट झाली असून मागणी व पुरवठा यात तफावत होण्याची शक्यता असल्याने भाववाढ होईल. अतिरिक्त पाऊस झाल्याने कांदा रोपे खराब झाली. त्यातच एक निकृष्ट दर्जाचे बियाणे निघाल्याने अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात 50 टक्के लागवड झाल्याने परिणाम झाला. वेळेवर झालेल्या लागवडी तही 70 टक्के उत्पन्न निघालेत तर जानेवारी महिन्यात झालेल्या लागवडीत चाळीस टक्के उत्पन्न निघाले. यावर्षी लागवडीखालील क्षेत्रात वाढ होऊनही मोठ्या प्रमाणात उत्पन्न कमी झाले. त्यातच कांदा बहरात आलेला असताना अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांद्याची प्रत खालावली. कांदा भुसार्यामध्ये साठविता आलेला नाही. अशीच परिस्थिती मध्य प्रदेश राजस्थान   बिहार या राज्यातही निर्माण झाल्याने कांदा कमी आहे. मार्च व एप्रिल या महिन्यांमध्ये आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ या राज्यातील ग्राहक असतात तसेच निर्यातदार ग्राहकही असतात. परंतु एप्रिल व मे महिन्यामध्ये नॉर्थ मध्ये दररोज रेल्वे व ट्रकने कांद्याची रवानगी होत आहे. हवामानाच्या बदल्यामुळे यावर्षी कांदा लवकर काढण्यात आला. जवळपास 20 मे पर्यंत शेतात कांदा राहणार नाही तर भुसार्‍या मध्ये ठेवलेला कांदा जून महिन्याच्या प्रारंभी विक्रीसाठी बाहेर काढला जाईल. त्यामुळे जून महिन्यातच कांद्याच्या दरवाढीचे संकेत निश्र्चितपणे असतील असे श्री बाफना यांनी सांगितले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post