राजकीय वादळ...शिवसेना मंत्री व देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट

 उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत गुप्तभेटशिवसेना नेते राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत नुकतीच गुप्त भेट घेतली असल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. तोक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही उदय सामंत फडणवीसांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत आले होते. या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांच्या या दाव्यामुळे एकच चर्चा सुरु असून तोक्ते वादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा सोडून उदय सामंत यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेण्यासाठी तातडीने भेट घेण्याचं नेमकं कारण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post