नेप्ती उपबाजारातील कांदा व्यवहार बंद, बाजार समितीचे कांदा व्यापार्यांना निर्देश

 नेप्ती उपबाजारातील कांदा व्यवहार ३१ मे पर्यंत बंद, बाजार समितीचे कांदा व्यापार्यांना निर्देशनगर: नगर शहरात कोव्हीड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती 31 मे अखेर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे. त्यानुसार नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने नेप्ती उपबाजारात होणारे कांदा व्यवहार बंद ठेवण्याबाबत कांदा व्यापार्यांना कळवले आहे. नेप्ती उपबाजार येथील कांदा व्यवहार हे दिनांक १८/०५/२१ रोजी रात्री १२ वाजेपासुन ते दिनांक ३१/०५/२०२१ रोजीचे रात्री १२ वाजेपर्यंत संपुर्णपणे बंद राहील. तसेंच उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता(४५ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनिय/कायदेशिर कार्यवाहीस पात्र राहतील.तरी सदर आदेशाचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास सर्वस्वी संबंधीताची जबाबदारी राहील, असे पत्र बाजार समिती सचिव यांनी जारी केले आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post