नगर जिल्हा सावरतोय...रूग्ण बरे होण्याचा वेग वाढला

 दिनांक २१ मे, २०२१


आज ३४१९ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या २४९२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

 

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.७३ टक्केअहमदनगर: जिल्ह्यात आज ३४१९ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २४ हजार ५५६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.७३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २४९२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७ हजार ६०३ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २८४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०३८ आणि अँटीजेन चाचणीत ११७० रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७, जामखेड ०५, कर्जत ०३, कोपरगाव ३९, नगर ग्रामीण ४६, नेवासा ५०, पारनेर ०१, पाथर्डी ०२, राहता १५, राहुरी १६, संगमनेर ०२, शेवगाव ०२, श्रीगोंदा ७२, श्रीरामपूर ०४, कॅंटोन्मेंट ०३, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५२, अकोले १७३, जामखेड १४, कर्जत ०८, कोपरगाव ३५, नगर ग्रा.६९,  नेवासा ८७,  पारनेर ३८, पाथर्डी २०, राहाता ७८,  राहुरी १५, संगमनेर १९७, शेवगाव ४४, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर ७५, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३ आणि इतर जिल्हा १५ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ११७० जण बाधित आढळुन आले. मनपा ७१, अकोले ९७,  जामखेड १६, कर्जत ३०, कोपरगाव ६२, नगर ग्रा. ६९, नेवासा ९०, पारनेर १४७, पाथर्डी ९७,  राहाता ६०, राहुरी ७४, संगमनेर ९५, शेवगाव ४५, श्रीगोंदा १३९, श्रीरामपूर ६५ आणि इतर जिल्हा १३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा २२४, अकोले ३८८, जामखेड ६९, कर्जत ९४,  कोपरगाव १५०, नगर ग्रामीण २७६, नेवासा १९४, पारनेर २३०, पाथर्डी १५७, राहाता २२९, राहुरी ३०१, संगमनेर ४४३,  शेवगाव १५४,  श्रीगोंदा २०७,  श्रीरामपूर २५८, कॅन्टोन्मेंट १६, मिलिटरी हॉस्पिटल ०२ आणि इतर जिल्हा २४ आणि इतर राज्य ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या:२,२४,५५६


उपचार सुरू असलेले रूग्ण:१७६०३


मृत्यू:२६५०


एकूण रूग्ण संख्या:२,४४,८०९


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा


प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या


अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post