वॉईन शॉप सुरू पण शेतक-यांना भाजीपाला विक्रीस बंदी, शनिवारपासून आयुक्तांच्या निवासस्थानासमोर उपोषण


 

आपणास अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नम्र मागणी करत आहोत कि,

   आपण दि.२ मे पासुन सलग १५ मे पर्यंत शेतमाल भाजीपाला विक्री बंदी लागु केलेली आहे. हि बंदी शेतकरी व शहरातील लहानमुले, गरोदर महिला व आजारी नागरिक यांच्यावर अन्यायकारक आहे. आम्ही आपणास वेळोवेळी इमेल व दूरध्वनीद्वारे याबाबत कळविले आहे. आपणास या गंभीर प्रश्नावर मनपाने शेतमाल भाजीपाला खरेदीकेंद्र सुरू करत मनपा हद्दीतील नागरिकांना पुरविण्याचा उपाय करण्याचेही सुचविले होते परंतु आपण दुर्लक्ष करत आहात. आपण कृषी विभागाच्या 'आत्मा' या संस्थेसोबत बोलतो आहोत, असे खोटेच सांगितलेले दिसून येत आहे. आपण एकच दिवस अंशत: बंदी उठवत पुन्हा दि.१६ मे पासुन ती सुधारीत आदेश काढत ०१ जुन पर्यंत वाढवली आहे.
    आपल्या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा मोठा आहे, हे आपण जाणत असाल.  आपण दि.१६ रोजी काढलेल्या आदेशात मोठी तफावत आहे.
परिशिष्ट - अ मधील सुरू ठेवायच्या गोष्टींमधे दुकानदारांना बि-बियाणे, खते विक्रीस परवानगी दिलेली आहे तर  परिशिष्ट - ब मधील विक्रीस बंदी घातलेल्या गोष्टींमधे शेतकरी मोठया कष्टाने कर्जभानगडी करून पिकवत असलेल्या शेतमाल भाजीपाल्यास संपुर्ण विक्री बंदी घातलेली आहे. या तफावतीमुळे या आदेशाचा अर्थ आहे कि, शेतक-यांनी दुकानदाराकडून बि-बियाणे, खते विकत घ्यायची पण आपला भाजीपाला विक्री करायची नाही. हि गोष्ट अत्यंत अन्यायकारक आहे, शेतकरी व जनविरोधी आहे. आपण मनपा हद्दीत फेरफटका मारला तर असे लक्षात येईल कि आपल्या या निर्णयामुळे शहरात 'वॉईन शॉप सुरू आहेत पण शेतक-यांना भाजीपाला विक्रीस बंदी'
    शहरातील लहान बालके, गरोदर महिला व आजारी नागरिक यांना भाजीपाला, अंडी हा सकस आहार मिळाला तरच त्यांची कोरोनाविरूध्द लढण्याची इम्युनिटी पॉवर वाढणार आहे.
    आपल्या या शेतमाल भाजीपाला विक्री बंदीमुळे मुले, महिला व आजारी नागरिकांच्या सकस आहार खाण्याच्या मानवी हक्कावर गदा येत आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
   
    मनपा हद्दीतील शेतमाल 'भाजीपाला विक्री बंदी' उठवुन मार्केटयार्ड मधील फळे व भाजीपाला विक्री 'संयुक्तपणे गर्दीचे नियमन' करत सुरू करावी
   शेतकरी, लहानमुले, गरोदर महिला व आजारी नागरिक यांचा प्रश्न सोडविण्याकडे गांभिर्याने पहाणार नसाल, प्रश्न सोडविणार नसाल तर आम्ही आपल्या निवासस्थानी शनिवार दि.२२ मे २०२१ रोजी सकाळी ११ वाजलेपासुन लाक्षणिक उपोषण सुरू करू. याची नोंद घ्यावी.

*कळावे*
कॉम्रेड भैरवनाथ वाकळे,
अखिल भारतीय किसान सभा,
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शहरसेक्रेटरी,अहमदनगर.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post