करोनाकाळात कर्तव्यात कसूर, नगर तालुक्यातील शिक्षकांना नोटिसा

करोनाकाळात कर्तव्यात कसूर, नगर तालुक्यातील शिक्षकांना नोटिसा नगर : - नगर तालुकयात मोठया प्रमाणावर कोरोना प्रादुर्भाव वाढत असून प्रशासनाकडून दिवसेंदिवस मोठया प्रमाणावर उपाययोजना केल्या जात आहेत. प्रशासनाकडून प्राथमिक शिक्षकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. गावातील • विलगीकरण कक्षात रुग्णांच्या नोंदी ठेवणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोवीड के सेंटर व लसीकरण केंद्र इ. ठिकाणी शिक्षकांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षकांकडून कोरोना या जागतिक आपत्ती काळात मोलाचे योगदान मिळत आहे.

तथापी ग्रामस्तरावर काही लोक कोरोना काळात नेमणूक दिलेल्या कर्तव्याकडे जाणूनबुजून पाठ फिरवत आहेत. कर्तव्यात कसूर करण्या-या व हलगर्जीपणा करण्या-या कर्मचा-यांवर कडक कारवाई तालुका प्रशासनाकडून केली जांत आहे. कर्तव्यात कसूर करणा-या  राजेंद्र ढगे सहा. शिक्षक जि. प. प्राथ. शाळा, आठवड व   शरद म्हस्के , सहा. शिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा, मांडवे तसेच यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागितला आहे. कोरोना आपत्तीच्या काळात व शासकिय कर्मचा-यांनी त्यांना नेमून दिलेले कर्तव्य पार पाडावे. यापुढे कर्तव्यात कसूर करणा-या कर्मचा-यांची गय केली जाणार नाही. तसेच सर्व कर्मचा-यांनी एकजुटीने प्रयत्न करून आपला तालुका लवकरात लवकर कोरोना मुक्त करावा असे आव्हान तहसिलदार उमेश पाटील यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post